नमस्कार!
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या *प्रकाशकमित्र साहाय्यता निधीसाठी* देणगी देण्याबाबत प्रकाशक संघाने केलेल्या आवाहनाला आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रथम आपल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार!
*७३ व्यक्ती आणि संस्थांनी आपले योगदान दिलेले आहे. एकूण रुपये १,७४,५७२/- एवढी रक्कम जमा झालेली आहे.* (यामध्ये प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा केलेले व सध्या रक्कम जाहीर केलेले अश्या दोघांच्याही रकमांचा समावेश आहे.)
सध्याच्या एकूणच परिस्थितीमुळे नजीकच्या व्यावसायिक भविष्याबाबतचे चित्र अतिशय अस्पष्ट असतानाही आपण सर्वांनी पुढे केलेला मदतीचा हात हा अतिशय कौतुकास्पद आहे. पुढील दोन ते तीन दिवसात जमा झालेली मदत गरजू मंडळींपर्यंत पोहोचणार असून *या रकमेतील काही भाग हा मुख्यमंत्री निधीसाठीही पाठवला जाणार आहे*.
*नेहमीप्रमाणे आपल्या प्रकाशक संघावर आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत!*
प्रमुख कार्यवाह पराग लोणकर, खजिनदार सुकुमार बेरी आणि कार्यवाह रमेश शेलार यांची पुढील सर्व कामे पूर्ण करण्याकरिता संघाने कमिटी तयार केली आहे. ढोबळे त्यांना सहाय्यक असतील.१७ तारखेपासून या कमिटीचे काम सुरू ही झाले आहे. कमिटीसाठी कार्यकारिणीने पूर्ण विचारांती काही निकष ठरवले आहेत, ते सर्वांच्या माहितीसाठी पुढे देत आहे. त्या नुसार या कमिटीचे काम चालेल.
आपली प्रत्येक रक्कम योग्य ठिकाणीच जाईल, यात काही शंका असू नये. कार्यकारिणीचा निर्णय येथे सर्वांसाठी कळवला जाईलच. प्रकाशक संघावर असाच विश्वास कायम असावा.
*पुन्हा एकदा अगदी मनापासून सर्वांना धन्यवाद देत आहे.*
*- अ.भा.म. प्रकाशक संघ कार्यकारिणी.*
Comments are closed.