Press "Enter" to skip to content

प्रकाशन व्यवसाय- रोजगार आणि अर्थार्जनाची उत्तम संधी!

*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‌आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वरील विषयावर पुण्यात पूर्ण दिवसभराची कार्यशाळा होणार आहे.* ही कार्यशाळा दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ येथे होणार आहे.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये प्रकाशन हा चांगले उत्पन्न देण्याबरोबरच सांस्कृतिक महत्वाचा व्यवसाय कसा आहे? या व्यवसायात रोजगाराच्या कोण कोणत्या संधी उपलब्ध असतात याची माहिती देण्यात येईल. दुसर्‍या सत्रामध्ये प्रकाशन व्यवसायामध्ये संपादन, अनुवाद, मुद्रितशोधन या तीन महत्त्वाच्या घटकांसाठी काय तयारी आवश्यक आहे, त्यासाठीची पात्रता कशी प्राप्त करता येईल यांवर ऊहापोह करण्यात येईल. तिसर्‍या सत्रामध्ये पुस्तकाचे डिझायनिंग व मुखपृष्ठ डिझायनिंग, ऑडीओ पुस्तके, इबुक्स, या साऱ्यासाठी युनिकोडचा वापर कसा करावा, याची माहिती देण्यात येईल. चौथ्या सत्रामध्ये पुस्तक विक्री (सेलिंग व मार्केटिंग)चे परंपरागत व आधुनिक (सोशल मीडियासारखे) मार्ग या संदर्भात माहिती देण्यात येईल.

ही कार्यशाळा नोकरी-व्यवसायाचे नेहमीचे मार्ग न चोखाळता एका समृद्ध सांस्कृतिक विश्वाचा भाग बनण्याची संधी देणाऱ्या व्यवसायाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त स्त्री-पुरुष मंडळींपर्यंत प्रत्येकास उपयुक्त ठरेल अशी आहे. लेखक-कवी मंडळींसाठीही अतिशय आवश्यक अशी प्रकाशन व्यवसायाची इत्यंभूत माहिती देणारी अशी हे कार्यशाळा असेल.

या कार्यशाळेसाठी अतिशय नाममात्र शुल्क ₹ ३५०/- (भोजनासह) असून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. (जागा अतिशय मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य!) नोंदणीसाठी संपर्क:- अ.भा. म. प्रकाशक संघ, २५१ क, शनिवार पेठ, पुणे-३०. दूरध्वनी:- (०२०) २४४८३०३१ किंवा ९८५०९६२८०७ (श्री. पराग लोणकर)