चिपळूण व महाराष्ट्राच्या इतर भागांत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक ग्रंथालयांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मराठी भाषा आणि वाचन संस्कृती यासाठी जाणीवपूर्वक झटणाऱ्या या ग्रंथालयांना आता मदतीची गरज आहे. या महत्वाच्या कार्यासाठी अ. भा. मराठी प्रकाशक संघाने आपले काम चालू केले आहे.
या मोठ्या कामासाठी लेखक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांबरोबरच सर्व क्षेत्रातील जागरूक नागरिकांकडून सहकार्य लागणार आहे. प्रकाशक संघ या ग्रंथालयांसाठी आर्थिक व पुस्तक रुपात सर्वांना मदतीचे विनम्र आवाहन करत आहे. या मदतीसाठी प्रकाशक संघाने काही निकष आखलेले आहेत.
आपली पुस्तक रूपातील मदत शक्यतो प्रत्येकी किमान छापील मूल्य रु. ५०००/- इतक्या पुस्तकांची असावी. यासाठी कमाल मर्यादा नाही. त्यामुळे आपण जास्तीत जास्त पुस्तके मदत देऊ शकता. मदत म्हणून देण्यात येणारी पुस्तके अतिशय सुस्थितीत असावीत. वाळवी लागलेली, ओली किंवा इतर प्रकारे खराब झालेली, जुनी पुस्तके कृपया स्वीकारली जाणार नाहीत.
आर्थिक मदत देणाऱ्या मंडळींनी किमान रु. १०००/- ची मदत करावी. (कमाल मर्यादा अर्थातच नाही!)
आपली आर्थिक व पुस्तक रूपातील मदत मंगळवार दि. १० ऑगस्ट पर्यंत पोहोचेल अशी पाठवावी. आर्थिक मदत आपण संघाच्या खात्यात भरून रक्कम भरल्याची पोच (पावती/screenshot) आपल्या संघाच्या नवनिर्वाचित कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे (९८८१४ ३५६८०) यांना पाठवावी किंवा मेसेजने कळवावे. म्हणजे दप्तरी नोंद घेऊन आपल्याला पोच-पावती पाठवता येईल.
प्रकाशक संघ अनेक ग्रंथालयांना मदत करणार आहे. त्यामुळे लेखक/प्रकाशक/ग्रंथ विक्रेते पुस्तकं पाठवताना एका पुस्तकाच्या एकापेक्षा जास्त प्रतीही (जास्तीत जास्त १०) देऊ शकतात.
अापण संघाच्या पुढील समिती सदस्यांपैकी एकास संपर्क करुन त्यांच्याकडे पुस्तकं पाठवू शकता.
१) अशोक मुळे, मुंबई – ९८२०७ ४८०८१
२) डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, पुणे – ९८५०५ २८२९६
३) विलास पोतदार, नाशिक – ९८९०९ ३३७९०
४) युवराज माळी, जळगाव – ९७६४६ ९४७९७
५) नितीन हिरवे, पुणे – ९७६५५ ५९३२२
किंवा समिती सदस्यांपैकी एकास कळवून आपण थेट पुढील पत्त्यावरही पुस्तकं पाठवू शकता.
मे. डायमंड पब्लिकेशन्स
२६४ अनुग्रह अपार्टमेंट,
वर्तक बागेसमोर, ओंकारेश्वर मंदिराजवळ,
शनिवार पेठ, पुणे-४११ ०३०.
भ्रमणध्वनी: ९८८१४७३४१६.
पुस्तकं पाठवण्याची वेळ- स. १० ते दु. २.
पुण्यातील ज्या मंडळींना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल त्यांच्याकडून पुस्तके आणण्याची व्यवस्था केली आहे. कृपया त्यासाठी सौ. वीणा पेशवे (९८८१४ ३५६८०) यांना मेसेज करावा व समिती सदस्यांपैकी एकास कळवावे.
पुस्तकांची पोच दिली जाईल.
आर्थिक मदत जमा करण्यासाठी प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील:-
खात्याचे नाव:- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
बँक:- बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा:- शनिवार पेठ, पुणे.
बचत खाते क्र:- २०१३६९४२७३३
IFSC:- MAHB0000675
– प्रमुख कार्यवाह