दिनांक १७ जून २०१८ रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या ‘जीवनगौरव’, ‘साहित्यसेवा कृतज्ञता’ व ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती’ पुरस्कार सोहळ्यामध्ये युनिकोड टाइप याविषयी प्रकाशकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या नवीन तंत्रज्ञानाची उपयुक्तता उपस्थित सर्वच प्रकाशकांच्या चांगलीच लक्षात आली. मात्र याबाबत अधिक सखोल व हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणता येईल अशा ज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी एक स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात यावी अशी उपस्थित सर्वच प्रकाशकांनी प्रकाशक संघाला विनंती केली होती. प्रकाशकांच्या या विनंतीला मान देऊन प्रकाशन संघाने शुक्रवार, दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजी संपूर्ण दिवसभराची युनिकोड विषयक कार्यशाळा आयोजित केली आहे.
मार्गदर्शनासाठी खालील ज्येष्ठ व श्रेष्ठ तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. १) मा. लक्ष्मीकांत देशमुख २) पद्मश्री माधव गाडगीळ – ज्येष्ठ शास्त्रज्ञ ३) श्री. विवेक सावंत – एमकेसीएलचे कार्यकारी संचालक ४) श्री. दीपक शिकारपूर – आय.टी. तज्ज्ञ ५) श्री. सुबोध कुलकर्णी – आय.टी. तज्ज्ञ ६) श्री. अानंद काटीकर – संचालक, राज्य मराठी भाषा विकास परिषद. ७) श्री. सुशांत – राज्य मराठी भाषा विकास परिषद ८) श्री. कुलभूषण बिरणाले – राज्य मराठी भाषा विकास परिषद.
कार्यक्रमाचा दिनांक :- ७ सप्टेंबर २०१८ कार्यक्रमाची वेळ :- सकाळी ९.३० ते सायंकाळी ६. कार्यक्रमाचे शुल्क :- रुपये ३०० . (यामध्ये दोन वेळचा चहा, नास्टा, दुपारचे भोजन व प्रशिक्षण शुल्क व प्रशिक्षण साहित्य यांचा समावेश आहे. जास्तीत जास्त प्रकाशकांना आणि त्यांचेकडील आॅपरेटर्सना सहभाग घेता यावा म्हणून संघाने खर्चाच्या मानाने शुल्क अत्यंत अल्प ठेवले आहे हे कृपया लक्षात घ्यावे.) ज्या ज्या प्रकाशकांना स्वतःला येणे शक्य नसेल त्यांनी आपल्या संस्थेत/संस्थेसाठी काम करणाऱ्या अक्षरजुळणीकारांना (डीटीपी ऑपरेटर) जरूर पाठवावे. हे सारेच प्रशिक्षण प्रकाशकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे हे आपण जाणताच! या कार्यशाळेसाठी नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१८. नोंदणीसाठी प्रकाशन संघाचे कार्यालयीन कार्यवाह श्री. भास्कर ढोबळे (भ्रमणध्वनी:- ७३५००१५७५६) यांच्याशी संपर्क साधावा.
Comments are closed.