Press "Enter" to skip to content

दुसरे लेखक-प्रकाशक साहित्य संमेलन उत्स्फूर्त प्रतिक्रिया

चिपळूणचे आपले दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन नुकतेच संपन्न झाले. संमेलनाहुन परत आल्यावर यातील अनेकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या! त्या पुढे त्यांच्याच शब्दात देत आहोत.

या प्रतिक्रिया आम्हा कार्यकारिणी सदस्यांना खूपच समाधान देणाऱ्या असल्या तरी प्रकाशक संघाचे यापुढचे उपक्रम असेच व यापेक्षा अधिक उत्तर प्रकारे संपन्न व्हावेत ही आमच्यावरची जबाबदारी वाढवणाऱ्या आहेत.

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!

– कार्यवाह.

आमची खूप छान व्यवस्था ठेवलीत, त्याबद्दल श्री पराग लोणकर, श्रीभास्कर ढोबळे, स्नेहसुधा ताईंचे आणि चिपळूण येथील व्यवस्थापकांचे मनापासून आभार…
– शर्मिला कुलकर्णी

संपूर्ण संमेलनाचे उत्तम संयोजन!
बर्वेसर, स्नेहसुधाताई, पराग लोणकर, कडू… सर्वांचे धन्यवाद
– श्री. राजेंद्र माने.

संमेलन छान झाले!
– गौरी साठे.

या साहित्य संमेलनात अनेक नवीन ओळखी झाल्या, खूप छान मैत्रिणी मिळाल्या, साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर भेटले, त्यांचे अनुभव ऐकून आमच्या कक्षा रुंदावल्या, नवीन प्रेरणा मिळाल्या. आयोजन आणि व्यवस्थापन, मला खूप भावले. पानिपतकार विश्वास पाटील यांची मुलाखत म्हणजे तर मेजवानीच होती! बर्वे सर, स्नेहसुधा ताई, पराग, कडू, ढोबळे सर यांना विशेष धन्यवाद!🙏
– शर्मिला कुलकर्णी.

दुसर्‍या लेखक प्रकाशक संमेलनाचे संयोजन ऊत्तम केले होते. सर्व संयोजकांचे मनःपूर्वक आभार!🙏🙏
– नीलिमा कुलकर्णी.

Nice
– सिद्धेश्वर घुले.

नमस्कार, पहिल्यांदाच या संमेलनाला आले. संमेलनातून खूप काही शिकायला मिळालं. अनुभवायला मिळालं. कल्पना आवडली. त्यामुळे या प्रकाशक संघाचे सभासदत्व मिळावे अशी माझी इच्छा आहे.
– तृप्ती कुलकर्णी.

दुसरे लेखक प्रकाशक साहित्य संमेलन सर्वांग खूपच उत्तम!👍
– योगेश नांदुरकर.

सर्वोत्कृष्ट अनुभव आला.
आम्ही धन्य झालो. . . .
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. …
– सुनील गायकवाड.

नमस्कार,
मी शाकुंतल या नावाने मी काव्यलेखन करीत असतो.
सूत्रसंचालनाची आवड असून राज्यभर त्यानिमित्ताने दौरे होत असतात.
या व्यासपीठावर काव्य सादर करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता.
सादरीकरण करताना किती ताकद लागते, बोलण्याची लकब याविषयी शिकायला मिळाले.
संयोजन ऊत्तम होते.
– भारत शंकर सानप.

नमस्कार
सर्वांना सस्नेह नमस्कार 🙏💐
पुण्यात सुखरुप पोचलो. आपण सर्वांनी अतिशय प्रेमाने आम्हाला आमंत्रित केले. साहित्यिक आणि सांगितिक
सर्जनशील कुटुंब म्हणून आमचा गौरव केलात त्याबद्दल आपणा सर्वांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.🙏🙏🙏
आदरणीय प्रकाश देशपांडे आणि प्रकाशक राजीव बर्वे यांचे आणि सर्व संयोजकांचे.. सहका-यांचे आभार आणि आपणा सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो.
संमेलनामुळे अनेक स्नेही आणि मित्र मिळाले. गाठीभेटी झाल्या. नव्या ओळखी हे आवर्जून नमूद करतो.
संमेलन अतिशय उत्तम झाले.
मनःपूर्वक धन्यवाद आणि पुनश्च आभार.💐💐💐💐
– राजीव, प्रांजली आणि संगीता बर्वे कुटुंबीय

सर , आपल्या अध्यक्षतेखाली हे संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले अर्थात त्यासाठीचे तुमचे परिश्रम पदोपदी जाणवत होते. सर्वच व्यवस्था अत्यंत चोख होती. बसमधून आलेल्या आम्हा पुणेकरांच्या व्यवस्थेसाठी ढोबळेसर, जयदीप कडू आणि पराग लोणकर यांनी विशेष तत्परता दाखवली. चिपळूणकरांची आतिथ्यशीलता मनाला भावली. विशेषत: प्रकाश देशपांडेसर आणि श्री धनंजय चितळे यांची कार्यतत्परता चकित करणारी होती.
अशा या सुंदर वातावरणातले दोन दिवस अविस्मरणीयच राहतील. अनेक नवे साहित्यस्नेही मिळाले. ज्येष्ठांचे अनुभवी मार्गदर्शनपर विचार ऐकायला मिळाले. तुम्हा सर्वांशी या निमित्याने भेट झाली ती निहाराच्या डॉ. स्नेहसुधाताईंच्यामुळे!
तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. 🙏 मला प्रकाशक संघाची सभासद व्हायला आवडेल.
– प्रतिमा कुलकर्णी.

लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे हे दुसरे वर्ष. भिलारपासून सुरू झालेले हे आनंद पर्व दुसऱ्या वर्षी देखील तेवढ्याच उत्साहात पार पडले. पुढील काळात हे संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दर्जा प्राप्त करेल यात शंका नाही.
– अशोक भांबुरे

नमस्कार. संमेलनात सहभागी होण्याची पहिली संधी स्नेहसुधा ताईंमुळे मिळाली. त्यामुळे प्रथम त्यांचे मनापासून आभार. हा सर्व अनुभव खूप संस्मरणीय होता. नियोजन आणि अगत्य वाखाणण्यासारखे होते. मा.विश्वास पाटील यांची मुलाखतीने भारावून टाकले. सर्व व्यवस्था उत्तम होती. खूप नवीन माहिती आणि नवीन साहित्य क्षेत्रातील मैत्रिणी भेटल्या त्यामुळे वेगळा आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद.
– सौ. आरती मोने..

नियोजन उत्तम! एक संस्मरणीय अनुभव! अनेक साहीत्य प्रेमी भगिनी मिळाल्या. सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा!
– शुभदा सप्रे

नमस्कार!
मागील वर्षी भिलारला आणि या वर्षी चिपळूणला आले होते. दोन्हीकडे व्यवस्था उत्तम होती. यावर्षीची सत्रही चांगली झाली. नवीन ओळखी झाल्या. पुढील वर्षीही सहभागी व्हायला आवडेल. सर्व संयोजकांचे मनःपूर्वक आभार!
– नीलिमा कुलकर्णी.

चिपळूण लेखक प्रकाशक संमेलनाचा कार्यक्रम खूप चांगला झाला. आयोजकांना धन्यवाद! प्रश्न पुस्तक विक्रीचा. तो कोणाच्याच हातात नाही.
– वैशाली प्रकाशन.

संमेलन छान झाले. व्यवस्था उत्तम होती. संयोजक, व्यवस्थापक व टीमचे मनापासून अभिनंदन! सर्व सहकाऱ्यांसह दोन दिवस छान गेले.
– विश्वास गांगुर्डे

सर्व कार्यक्रम सोहळा उत्तम झाला, फक्त पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्यात स्टेज वर, इतर सर्व पुरुषांच्या बरोबरीने एखादी चिपळूण मधील प्रतिष्ठित/कर्तृत्ववान स्त्री देखील असती,तर अधिक आवडले असते!
– शर्मिला कुलकर्णी.

लेखक प्रकाशन संमेलन फार छान झाले. २ दिवस अगदी छान गेले. अनेकांच्या नवीन ओळखी झाल्या. नवे प्रकाशक भेटले पुढील संमेलन या संमेलनाच्या पेक्षा अधिक चांगले करण्यासाठी आपण सर्व मिळून सहकार्य करूया.
– अमेय गुप्ते.

नाशिकवरून चिपळूणचा एवढा प्रवास केल्यावर देखील कुठे थकवा जाणवला नाही, याचे कारण नियोजन. मा. ढोबळे सर व परागजी यांनी सर्वांची काळजी घेतली. खूपच छान वाटले. सर्वांच्या ओळखी झाल्या. सर्वांच्या सोबत दोन दिवस कसे गेले लक्षातही आले नाही.
– रवींद्र पाटील, नाशिक.

छान नियोजन होते. सर्वांचे अभिनंदन आणि आभार!
– विनायक रानडे.

आपण सर्वांनी चिपळूणला मजा लुटली.
– माधवी आपटे.

सर्वांशी संवाद साधून समृद्ध होता आले. धन्यवाद!
– चेतन कोळी.

लेखक प्रकाशक संमेलनातील उपस्थितांच्या प्रतिक्रिया/शेरे :
* प्रकाश देशपांडे/राजीव बर्वे – स्थितप्रज्ञ कर्मयोगी
* अनिल मेहता – प्रकाशन क्षेत्रातील भीष्माचार्य
* डॉ. तानाजीराव चोरगे – बुलंद आधारस्तंभ
* अरूण इंगवले/संतोष गोनबरे – सूत्रधार
* आमदार शेखर निकम – मांडवशोभा
* धनंजय चितळे – ब्रह्मानंदी निमग्न मुनी
* विश्वास पाटील – रसिकमान्य संवाद
* मिलिंद जोशी – कसलेले मुलाखतकार
* घन:श्याम पाटील/,अमृता कुलकर्णी/चेतन कोळी/विनायक रानडे – धडाडीचे साहित्यसेवक
* पराग लोणकर/स्नेहसुधा कुलकर्णी/भास्कर ढोबळे – पडद्यामागचे कष्टकरी
* डॉ. राजीव/डॉ. संगीता/प्रियांजली बर्वे – संमेलनातील “नूतन गंधर्व संगीत महोत्सव”
* कवींची मांदियाळी – रसिकांच्या ह्रृदयावर अलगद फुंकर घालणारे भावसरगमकार
* उपस्थित श्रोते – साहित्याचे यात्रेकरू
* दातार केटरर्स – सर्वांना खाद्यतृप्ती देणारे बल्लवाचार्य
* रवींद्र गुर्जर – भावी अध्यक्ष
* भगवान वीरेश्वर – मूक साक्षीदार/आशीर्वाददाता
* स्टॉलधारक – फळाची अपेक्षा न ठेवता पुस्तकांची ओझी वाहणारे साहित्य-भोई
– रवींद्र गुर्जर.

दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन,
चिपळूण.
हे संमेलन म्हणजे साहित्य आणि संगीत यांचा सुरेल संगम साधणारा सुखद अनुभव होता!
कशा कशाचे म्हणून कौतुक करावे आणि काय काय म्हणून आठवावे? प्रकाशनयोगी मा.अनिलजी मेहता यांच्या भाषणातील प्रकाशनाच्या
नव्या वाटांचे दिग्दर्शन, की चपराककार घनश्याम पाटीलांचे आपल्या भाषणातून गदगदा हलवणं की विश्वासराव पाटलांची मनमोकळी अन अनोखी मुलाखत? आणि या सर्वांवर कळस ठरावा असा,” सर्जनशील बर्वे कुटुंब” नामक सांगितिक आविष्कार; सिझोफेनियावर देखील कविता केली जाते हे प्रत्यक्ष ऐकून भान हरपण्याचेच तेवढे राहिले होते; हे सर्व उभे करणारे ‘दिलीपराज’ चे श्री राजीव बर्वे व श्री ढोबळे, श्री लोणकर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांचे सानंद आभार आणि पुढच्या नाशिक येथे होणाऱ्या संमेलनासाठी पाटीभर शुभेच्छा !!
– प्रा.चंद्रसेन टिळेकर
संस्थापक,आचार्य अत्रे कट्टा,मुंबई

नमस्कार. मी चंद्रकांत शंकर नवले, ज्येष्ठ नागरिक व नव लेखक, मी भिलार येथे व चिपळूण येथील साहित्य संमेलना सहभागी होतो व पुढील वर्षी ही सहभागी होइल, दोन्ही संमेलने सुपर-डुपर झालीत. सर्व टीम ने उत्कृष्ट असे कार्य केले आहे. मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
– चंद्रकांत शंकर नवले.

दुसरे लेखक प्रकाशक संमेलन, चिपळूण या मध्ये सहभाग मिळाल्यामुळे खूप आनंद वाटला. सर्वच उत्तम व्यवस्थेमुळे संमेलन अतिशय छान झाले. सुग्रास भोजन आणि ज्ञानसमृद्ध कार्यक्रमांमुळे जिंव्हा आणि मन दोन्ही तृप्त झाले.
पानिपतकार विश्वास पाटील यांची मुलाखत तसेच श्री देशपांडे यांचे सूत्रसंचालन, ‘पुस्तकाचा प्रवास’ हा परिसंवाद हे आणि सगळेच कार्यक्रम सुंदर झाले.
डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्यामुळे मला संमेलनात सहभागी होता आले म्हणून मी त्यांची आभारी आहे. आणि माझे साहित्य संघ दक्षिण, पुणे मधले सर्व स्नेहीजन यांच्यामुळे प्रवास व निवास सुखकर झाला.
आभारासाठी शब्द अपुरे आहेत. सर्वांना धन्यवाद !
– गीता पुजारी (कवयित्री), पुणे