नमस्कार!
वर्ष २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांतील पुढील अंकांची माननीय परीक्षकांनी पुरस्कारांसाठी निवड केलेली असून ही नावे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे!
आपल्या प्रकाशक संघाचे हे सर्व पुरस्कार दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना दिले जातात.
सर्व पुरस्कार विजेत्या प्रकाशकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
(विभाग – अंकाचे नाव – प्रकाशनाचे नाव)
विनोदी प्रथम – आवाज – आवाज प्रकाशन, बोरीवली.
विनोदी द्वितीय –श्यामसुंदर – आसावरी केळकर, पुणे.
ललित प्रथम – शब्दोत्सव – ममता प्रकाशन.
ललित द्वितीय – साहित्य चपराक – चपराक प्रकाशन, पुणे.
ललित तृतीय – शब्दमल्हार – शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक.
विशिष्ट विषय प्रथम – साहित्य सावाना – सार्वजनिक वाचनालय, नाशिक.
विशिष्ट विषय द्वितीय – शब्दालय – शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.
उपयुक्त व छंदविषयक प्रथम – समदा – समदा क्रिएशन, चिंचवड.
उपयुक्त व छंदविषयक द्वितीय – वेदांतश्री – वेदांतश्री प्रकाशन, पुणे.
उपयुक्त व छंदविषयक तृतीय – ग्रहांकित – चंद्रवल्लभ प्रकाशन, पुणे.
बालकुमार प्रथम – निर्मळ रानवारा – वंचित विकास संस्था, पुणे.
बालकुमार द्वितीय – मुलांचे मासिक – मुलांचे मासिक, नागपूर.
संकीर्ण प्रथम – धनंजय – नीलिमा कुलकर्णी, मुंबई.
संकीर्ण द्वितीय – दुर्गांच्या देशातून – दुर्गभान प्रकाशन, पुणे.
संकीर्ण तृतीय – जडणघडण – सह्याद्री प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ प्रथम – अक्षरधारा – रमेश राठीवडेकर, पुणे.
मुखपृष्ठ द्वितीय – मौज – मौज प्रकाशन गृह, मुंबई.
मुखपृष्ठ तृतीय – दैनिक सत्यवेध -– राहुल कुलकर्णी, सांगली.
डिजिटल अंक प्रथम – दृष्टी श्रुती – अमलताश बुक्स.
डिजिटल अंक उत्तेजनार्थ १ – कुंभश्री – कुंभश्री प्रकाशन, चिंचवड.
डिजिटल अंक उत्तेजनार्थ २ – ज्योत – जे. के. मीडिया.
– अ. भा. म. प्रकाशक संघ कार्यकारिणी