रविवार दिनांक ५ सप्टेंबर रोजीच्या आपल्या (सकाळी साडेदहा वाजता) मनोहर मंगल कार्यालय येथील पुरस्कार सोहोळ्याच्या आयोजनाची तयारी चालू आहे.
पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाबरोबरच एक अतिशय खास मुलाखतीचा कार्यक्रम यावर्षी सोहळ्यात संपन्न होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर हे यावर्षीचे आपले जीवनगौरव पुरस्कारार्थी राजहंस प्रकाशनाचे मा. दिलीप माजगावकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. अगदी चुकवू नये असा हा कार्यक्रम होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीमुळे तसेच आयोजन व भोजन व्यवस्थेच्या दृष्टीने कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. सर्व पुरस्कार विजेते आणि प्रकाशक संघाच्या सदस्यांनी तातडीने आपल्या कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे यांच्याकडे (९८८१४३५६८०) आपण येत असल्याचा मेसेज करून (एक किंवा दोन जण) नोंदणी करावी ही विनंती.
– पराग लोणकर
(प्रमुख कार्यवाह.)