आपल्या प्रकाशक संघातर्फे दरवर्षी खास प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी वर्ष २०१९ची पुस्तके स्वीकारणे आता आपण चालू केले आहे.
याबाबतचे माहितीपत्रक सोबत पाठवत आहे. प्रकाशकांच्या साहित्यक्षेत्रातील महत्त्वाच्या सहभागाची आवर्जून दखल घेणारे व प्रकाशकांसाठी दिले जाणारे हे एकमेव व अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत.
तरी, दरवर्षीप्रमाणे आपल्या संघ कार्यालयात आपली पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत ही विनंती. (सविस्तर माहिती सोबतच्या पत्रकात आहेच.)
– कार्यवाह