अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे परचुरे प्रकाशन मंदिरचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्कार आणि जेष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये आणि प्रमुख कार्यवाहक नितीन गोगटे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१७ आणि उत्कृष्ट दिवाळी अंक निर्मिती पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोहळा १७ जून २०१८ रोजी ‘मराठा चेंबर ऑफ कॅामर्स’च्या पद्मजी सभागृहात संपन्न झाला.
Comments are closed.